उस्मानाबाद – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा मुंबईच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्या बैठकीत उमेदवारीबाबत ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नावाशिवाय फारशी चर्चा झाली नाही. मात्र वयोमान आणि प्रकृती यामुळे डॉ. पद्मसिंह पाटील ही निवडणूक लढवण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे मग दुसरा उमेदवार कोण असा प्रश्न आहे. राष्ट्रवादीकडून सध्या पक्षातील विविध नावांची चर्चा सुरू आहे. मात्र ऐनवेळी वेगळचं नाव पुढं येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या नावावर एकमतही होऊ शकते.
राष्ट्रवादीकडून सध्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, विद्यमान अध्यक्ष नेताजी पाटील, अशोक जगदाळे यांच्यासोबत बार्शीचे आमदार दिलीप सोपल, भूम परांड्याचे आमदार राहुल मोटे यांची नावे चर्चेत आहेत. अर्चनाताई पाटील यांना तिकीट दिल्यास एकाच घरात दोन तिकीटे होतील. कारण राणा जगजितसिंह पाटील हे उस्मानाबादचे विद्यमान आमदार आहेत. ते आगामी विधानसभा निवडणूक लढवतील यात शंका नाही. तीच परिस्थिती राहुल मोटे यांची आहे. ते विद्यमान आमदार आहेत. मग भूम परांड्यात विधानसभेला कोण असा प्रश्न आहे.
बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही त्यांना फारसा विरोध होणार नाही. मात्र सोपल स्वतः लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. तसंच ते लोकसभेवर गेल्यास बार्शीत राष्ट्रवादीकडे विधानसभेसाठी नवा चेहरा नाही. दुसरीकडे जीवनारव गोरे, अशोक जगदाळे आणि नेताजी पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र ते शिवसेनेच्या उमेदवाराशी कितपत टक्कर देऊ शकतील याबाबत साशंकता आहे. त्यामुळे त्यांच्याबाबती विचार होण्याची शक्यता कामी आहे.
सध्या लोकसभेची तयारी करत असलेले डॉ. प्रतापसिंह पाटील यांचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. आर्थिकदृष्ट्याही ते तगडे आहेत. तसंच राजकारणात ते कोरी पाटी आहेत. जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांचे फारसे मतभेद नाहीत. त्यामुळे सर्वांना अक्सेप्टेबर उमेदवार म्हणून त्याचं ना पुढे येण्याची शक्यता वर्तविली आहे. तसे संकेत सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत.
डॉ. प्रतापसिंह पाटील हे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील धनेश्वरी बोरगाव या गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे वडील वेदप्रकाश पाटील हे राहुरी कृषीवियापीठाचे कुलगुरु होते. डॉ. प्रतापसिंह यांचे भाऊ परभणीचे शिवसेनेच आमदार आहेत. पाटील यांचे देशभर शिक्षण संस्थांचे जाळे आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे प्रतापसिंह पाटील यांचे जवळचे नाते आहे. त्यातून प्रतापसिंह पाटील यांचे नाव पुढे आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीची उस्मानाबादची धुरा सांभाळणारे राणा जगजितसिंह पाटील यांचीही या नावाला हरकत नसल्याची चर्चा आहे. राज्यात आघाडीची सत्ता आल्यास राणा पाटील यांना मंत्रिपद देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर खासदार निवडूण आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे प्रतापसिंह पाटील यांचं नाव राष्ट्रवादीकडून निश्चित होण्याची शक्यता आहे.
COMMENTS