उस्मानाबाद – आमदार राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांच्याकडे एकहाती सत्ता होती. विधानसभेसाठीही त्यांची एकमेव नाव चर्चेत होते. दरम्यान त्यांच्या भाजप प्रवेशाने आता उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण तसेच युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर या तिघांची नावे प्रामुख्याने चर्चेत होती.
दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांपासून आमदार काळे यांनी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील विविध गावात गाठीभेटी सुरु केल्या आहेत. मतदारांशी संपर्क साधून अडीअडचणी जाणून घेत आहेत. शिवाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार काळे याचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे उमेदवारी त्यांच्याकडे जाते की काय अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे. सध्या काळे हे शिक्षक मतदारसंघातून आमदार आहेत. शिवाय त्यांनी यापूर्वीही आमदार पाटील यांच्या घराण्याच्या विरोधात टक्कर दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे नाव प्रमुख्याने चर्चिले जात आहे. कुमारी सलगर यांचेही नाव चर्चेत आहे.
COMMENTS