उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. भाजपच्या नेत्यांशी त्यांच्या चर्चाही झाल्याचं बोलंलं जातंय. मात्र अजून त्यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळाला नाही. ते भाजपमध्ये जाणार याबाबतही अजून पक्का निर्णय झाला नसल्याचं बोलंलं जा्तंय. त्यामुळेच राणा पाटील यांचं ठरायच्या आधीच राष्ठ्रवादीचं ठरलं, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आज जिल्ह्यात येत आहे. भूम परांडा मतदारसंघातील वाशी या तालुक्याच्या ठिकाणी सभा होणार आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल मोटे हे आहेत. मोटे यांनीच या सभेचं आयोजन केलं आहे. मात्र सभेच्या पोस्टरवर राणा जगजितसिंह पाटील किंवा ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे फोटो नाहीत. राणा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि सर्वेसर्वा आहेत. असं असताना त्यांचा फोटो पोस्टरवर नाही.
आजच्या सभेला राणा पाटील किंवा त्यांचे समर्थक उपस्थित राहणार नसल्याचं बोलंलं जातंय. त्यामुळे राणा पाटील हे राष्ट्रादीवर नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. त्यांच्या भाजप प्रवेशावरही शिक्कामोर्तब झाला असल्याचं बोलंलं जातंय. मात्र त्याआधीच राष्ट्रवादीनं त्यांना पोस्टरवर स्थान दिलेलं नाही. राणा पाटील आपले राहिले नाहीत, ते पक्षापासून दूर गेले आहेत. त्यामुळे ते आता आपले राहिले नाहीत असं समजून पक्षाने त्यांना पोस्टरवर स्थान दिलेलं नाही असं दिसंतंय. त्यामुळेच राणा पाटलांच्या आधी राष्ट्रादीचं ठरल्याची चर्चा जिल्हात रंगु लागली आहे.
COMMENTS