उस्मानाबाद – जिल्ह्यात आठ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज मंगळवारी मतदान झाले. यामध्ये चार पंचायत समितीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. यातील तीन पंचायत समित्या परांडा विधानसभा मतदार संघातील आहेत. या तिन्ही पंचायत समितीमध्ये पूर्वी काँगेस, राष्ट्रवादी सत्ता होती. वाशी पंचायत समिती मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तेत होती. मात्र काँग्रेसचे सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे वाशी पंचायत समितीवर शिवसेनेचे एखादी वर्चस्व तयार झाले आहे. भूम पंचायत समितीमध्येही यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. यातील राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी शिवसेनेच्या गोटात सामील झाल्याने तिथेही राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसला असून पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे.
परंडा पंचायत समितीमध्येही यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र तिथेही आमदार प्राध्यापक तानाजी सावंत यांनी राहुल मोठे च्या वर्चस्वाला धक्का देत परंडा पंचायत समिती ताब्यात घेतली आहे. परंडा विधानसभा मतदारसंघ काबीज केल्यानंतर आता पंचायत समित्यांमध्ये ही आमदार सावंत यांनी जोरदार मुसंडी मारत तिनही पंचायत समित्या ताब्यात घेतल्याने माजी आमदार राहुल मोटे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातील दोन पंचायत समिती पैकी एक पंचायत समिती राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे करण्यात खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना यश आले आहे. कळम पंचायत समितीमध्ये यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती तिथेही काही सदस्यांना हाताशी धरून शिवसेनेचा सभापतिपद मिळवण्यात यश आला आहे. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीला मिळाला आहे.
भाजपची सत्ता पहिल्यांदाच उस्मानाबाद पंचायत समिती पदी आली आहे. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी सभापतीपद आरक्षण असल्यामुळे 24 पैकी तीन सदस्य असलेल्या भाजपला सभापतिपद मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्थात आमदार राणा पाटील यांच्या समर्थकाकडून भाजपला हे सभापतीपद मिळालं आहे. तर तुळजापूर पंचायत समितीत काँग्रेसला हादरा बसला असून मधुकरराव चव्हाण यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे. या ठिकाणची पंचायत समिती भाजपने काँग्रेसकडून खेचून घेतली आहे. तर उमरगा आणि लोहारा पंचायत समितीमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. एकूणच जिल्ह्यात आमदार पाटील यांच्या भाजपत पक्षांतर केल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का बसला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध शिवसेना आणि महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार असल्याचे संकेत आहेत.
COMMENTS