उस्मानाबाद – कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक ३२.५% पगार वाढ मिळून दिल्याबद्दल आज (दि १५) रोजी केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके व केंद्रीय उपसरचिटणीस संजय मोरे यांचा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना उस्मानाबादच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सन २०१८ ते २०२३ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी महावितरण,महापारेषण, महानिर्मित ,व होल्डिंग या चार कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक अशी पगार वाढ करण्यात आली, यासोबतच कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील २०% पगार वाढ देण्यात आली. व कर्मचारी यांना १२५ % डी.एय.मृझ सर्व भत्त्यामध्ये १०० % वाढ व ३२.५ % टक्के मूळ वेतनामध्ये वाढ करण्यात आली. व विदुत सहायक, उपकेंद्र सहाय्यक, लेखा सहाय्यक ,यांच्या मानधनमध्ये वाढ करण्यात आली आहे.
पगार वाढ प्रस्ताव तयार करून योग्य रितीने मा.ऊर्जा मंत्री व प्रशासन याच्या समोर बेठकीत मांडून कर्मचाऱ्यांच्या हिताचा व जिव्हाळ्याचा विषय लावून धरला व ऐतिहासिक पगार वाढ मिळवून दिल्याबद्दल मा संजय घोडके, केंद्रीय अध्यक्ष, प्रमुख उपस्थिती उपसरचिटणीस संजय मोरे, केंद्रीय उपाध्यक्ष पोटभरे एन डी, झोन अध्यक्ष गायकवाड आर एस, सिद्दिक मुलाणी यांचा सत्कार मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आला.
तंत्रज्ञ यांना ५०० रुपये बेसिक मध्ये वाढ, महावितरण यंत्रचालक यांच्या बेसिक मधील ताफवत व महापारेषण यंत्रचालक बेसिक एवढा मिळावा. लिपिक प्रोमशन या सह अन्य मागण्या मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली.या सर्व मागण्या साठी लवकर वेतन तफावत बेठीक होणार आहे.हे सर्व विषय निकाली संघटना काढणार आहे. कोणत्या ही कॅडर वर अन्याय होणार नाही असे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके यांनी सांगितले.
या वेळी उस्मानाबाद जिल्हा सचिव बापू जगदे, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष बालाजी आगवणे, संजय मालाले, संतोष भावसार, बाबासाहेब जाधव ,बाळासाहेब हळगावकर, सतीश हजारे ,महादेव वाघमारे, नागेश स्वामी, मुजमिल शेख, सुधाकर उनवणे,उस्मानाबाद सर्व पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS