भाजपच्या महाजन कुटूंबातील जमिनीचा वाद मिटला !

भाजपच्या महाजन कुटूंबातील जमिनीचा वाद मिटला !

उस्मानाबाद  – शहरात असणा-या महाजन कुटुंबातील वडिलोपार्जित संपत्तीचा वाद अखेर मिटला आहे. सारंगी प्रवीण महाजन यांनी उस्मानाबादच्या न्यायालयात जमीन वाटणीबाबत दाखल केलेला दावा मागे घेतला आहे. त्यामुळे हा वाद आता मिटला असल्याचं दिसत आहे.  न्यायलायाबाहेर तडजोड करून 26/3/13 च्या कौटूंबिक वाटणी पत्रानुसार कोर्टाबाहेर तडजोड केल्याचे सारंगी महाजन यांनी संबंधित पत्र न्यायालयात सादर केलं आहे.

महाजन कुटूंबाची उस्मानाबाद शहरात 1  हेक्टर 44 आर एवढी वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीबाबत महाजन कुटूंबात वाद सुरू होता. या जागेवर आता पूनम महाजन, रेखा महाजन यांच्या तपस्वी ट्रस्टची शाळा आणि महाविद्यालय उभारले आहे. या जागेबाबत महाजन कुटूंबात वाद सुरू होता. या जागेसाठी सारंगी महाजन यानी राहुल महाजन यांच्याविरोधात दावा ठोकला होता. परंतु सारंगी महाजन यांनी दाखले केलेला दावा मागे घेतल्यामुळे हा वाद आता मिटला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS