उस्मानाबाद – झेडपीत शिवसेनेची तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची बाजी !

उस्मानाबाद – झेडपीत शिवसेनेची तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची बाजी !

उस्मानाबाद – पंराडा तालुक्यातील अनाळा जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे उमेदवार धनंजय सावंत हे तब्बल 1300 मतांनी विजयी झाली आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिवसेनेला भाजपनं पाठिंबा दिला होता. मात्र काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणुक लढवली होती. ही जागा जिंकली असती तर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला असता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनीही जोरदार ताकद लावत भाजपचाही पाठिंबा मिळवला. त्यांचा त्यांना फायदा झाला. या गटात यापूर्वी शिवसेनेचाच सदस्य होता. तीन अपत्य असल्यामुळे त्यांची निवड रद्द झाली होती.

दुसरीकडे तुळजापूर तालुक्यातील काटी पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली आहे. पक्षाचे उमेदवार रामहरी थोरबोले ये 97 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपचे अविशान कोळी हे सरपंचपदी निवडूण आल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे इथे पोटनिवडणुक लागली होती. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपला आपली जागा गमवावी लागली.

COMMENTS