अमेरिकेत चौकशीसाठी पाकच्या पंतप्रधानांचे कपडे उतरवले !

अमेरिकेत चौकशीसाठी पाकच्या पंतप्रधानांचे कपडे उतरवले !

अमेरिका  पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी हे अमेरिकेच्या दौ-यावर गेले आहेत. या दौ-यादरम्यान अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्यांचा एअरपोर्टवर अपमान केल्याचं समोर आलं आहे. जॉन एफ केनेडी एअरपोर्टवर नेहमीची सुरक्षा चौकशी दरम्यान एका देशाच्या पंतप्रधानांची – अब्बासी यांची एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे कपडे उतरवून चौकशी करण्यात आली आहे. एखाद्या देशाच्या पंतप्रधानांची अशा पद्धतीनं कपडे उतरवून एअरपोर्टवर चौकशी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अमेरिकेनं एअरपोर्टवर केलेला हा अपमान पाकिस्तानच्या जिव्हारी लागला आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक चॅनलवर अब्बासी यांच्या अपमानाचा हा व्हिडिओ प्रामुख्याने दाखवला जात असून सोशल मीडियावरही जगभरात हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अमेरिकेनं केलेल्या या कृत्यामुळे अमेरिका-पाकिस्तानमधील संबंध बिघडत चालले असल्याचं दिसत आहे.

दरम्यान व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, अब्बासी यांची अगोदर कपडे उतरवून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर ते सामान घेऊन रवाना झाले आहेत. त्यामुळे हा केवळ पंतप्रधानांचा नाही तर एका राष्ट्राचा अपमान असल्याचं पाकनं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान अब्बासी गेल्या आठवड्यात आपल्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. या दौऱ्याच्या वेळी अब्बासी यांनी राष्ट्रपती माइक पेंस यांचीही भेट घेतली होती. यावेळी हा प्रकार घडल्यामुळे पाकिस्तानकडून जोरदार टीका होत आहे. परंतु अमेरिकेनं मात्र याबाबत अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचं समजत आहे.

COMMENTS