मुंबई – सर्वांचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपचे राजेंद्र गावित यांनी या निवडणुकीत जवळपास 30 हजार मतांनी विजय मिळवला असून त्यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला आहे. राजेंद्र गावित यांना जवळपास 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना सुमारे 2 लाख 43 हजार 210 मतं मिळाली आहेत. तसेच बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना सव्वा दोन लाख मतं मिळाली. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किरण गहला यांना जवळपास 71 हजार मतं मिळाली. काँग्रेसला या निवडणुकीत मोठी मजल मारता आली नाही. काँग्रेसचे उमेदवार दामोदर शिंगडा हे पाचव्या क्रमांकावर राहिले.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मधूकर कुकडे यांचा 48 हजार 97 मतांनी विजय झाला आहे. मधूकर कुकडे यांना चार लाख 42 हजार 213 मते मिळाली आहेत तर भाजपच्या हेमंत पटले यांना 3 लाख 84 हजार 116 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून नाना पटोले यांनी कुकडेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. नाना पटोले आणि भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यात अखेर नाना पटोले यांनी बाजी मारली.
COMMENTS