पालघर – पालघर पोटनिवडणुकीत आता उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगणार असल्याचं दिसून येत आहे. कारण पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता उद्धव ठाकरे यांनी उडी टाकली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पालघरमध्ये दोन जाहीर सभा होणार आहेत. नालासोपा-याला २३ मेला पहिली सभा होणार आहे तर दुसरी सभा बोईसरला २५ मे रोजी होणार आहे. तसेच शिवसेना-भाजपचे अनेक नेते-पदाधिकारी सध्या पालघरमध्ये ठाण मांडून बसले आहेत.
दरम्यान या निवडणुकीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली असून त्यांन दोन प्रचारसभा घेतल्या आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सभेतनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख यांनीही सभा घेण्याचं ठरवलं असून नालासोपा-याला २३ मेला पहिली सभा होणार आहे तर दुसरी सभा बोईसरला २५ मे रोजी होणार आहे. दरम्यान शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर या मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. या सामन्यात महाराष्ट्राचे वातावरण तापले असून कोणाला यश मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS