मुंबई – काँग्रेसच्या स्वार्थी वृत्तीमुळे विरोधक एकवटत नसल्याचा आरोप बहूजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. पालघर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांच्या दमदार कामगिरीनंतरही भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनी जवळपास सव्वादोन लाख तर माकप आणि काँग्रेसने अनुक्रमे 71 हजार आणि 47 हजार मते मिळवली. त्यामुळे काँग्रेस आणि बविआने निवडणूकपूर्व आघाडी केली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता असं बोललं जात आहे.
दरम्यान काँग्रेसच्या राजकीय स्वभावामुळे ही युती प्रत्यक्षात आली नाही. तसेच काँग्रेसचे वर्तन हे लेना बँकेसारखे आहे, देना बँकेसारखे नाही असही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. पालघर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांनी दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे शिवसेना-भाजपला बाजूला ठेवून विरोधी पक्षांचा विजय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु असं न होता भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी विजय मिळवला असल्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसची वृत्ती लेना बँकेसारखी असून देना बँकेसारखी नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
COMMENTS