मुंबई – पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी काल मतदान घेण्यात आलं. या निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार असुन मतमोजणीला सुरुवात झाली आहे. याठिकाणी 14 प्रभागांमधील 28 जागांसह एका नगराध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आलं आहे.
यामध्ये शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्षांमध्ये सामना रंगला आहे. एकूण 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी 30 जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 22 जण बंडखोर उमेदवार आहेत.
दरम्यान या नगरपरिषदेवर आतापर्यंत शिवसेनेची सत्ता होती, मात्र आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आयात उमेदवाराला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आणि त्यांनी बंडखोर म्हणून अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यावेळी शिवसेनेला धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे युतीची जादू याठिकाणी चालणार का हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS