ब्रेकिंग न्यूज – कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन !

ब्रेकिंग न्यूज – कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन !

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन झालं आहे.  पहाटे चार वाजून 35 मिनिटांनी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 67 वर्षांचे होते. या निधनानेमुळे भाजपसाठी मोठा धक्का समाजला जातो. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.  काल रात्री त्यांना अस्वथ वाटू लागल्यामुळे त्यांना मुंबईत हलवण्यात आलं होतं. मात्र पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचं निधन झालं.  त्यांच्या निधनामुळे भाजपावर आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

भारतीय जनता पार्टीचे पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांची ओळख होती. गोपीनाथ मुंडे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. ग्रामिण भागात भाजपा वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. फुंडकर तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडूण आले होते. आमदार, खासदार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी पद भूषवली होती.

COMMENTS