मुंबई – राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे 19 जिल्ह्यातील सुमारे 102 तालुक्यांमधील 3 हजार 724 गावांमधील 2 लाख 90 हजार 395 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. गहु, हरभरा, ज्वारी, मका, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश आहे, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून त्यातील 510 गावामधील सुमारे 46 हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ बुलढाणा 330 गावे, 41 हजार हेक्टर तर जालना जिल्ह्यातील 32 हजार हेक्टरचा समावेश आहे.
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे सुरु आहेत. बाधित 19 जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, नांदेड, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला,वाशिम, चंद्रपूर, गोंदीया, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील तालुका, गावनिहाय माहिती
बीड – माजलगाव, गेवराई, शिरुर- 42 गावे (बाधीत हेक्टर 10 हजार 632)
जालना – जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड- 175 (बाधीत हेक्टर 32 हजार)
परभणी – सेलू व जिंतूर- 23- (बाधीत हेक्टर 8 हजार 579)
जळगाव – जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर- 38 (बाधीत हेक्टर 2 हजार 495)
बुलढाणा – चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा- 330 (बाधीत हेक्टर 40 हजार 385)
अमरावती – मोर्शी,वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी व चिखलदरा- 510 (बाधीत हेक्टर 45 हजार 868)
अकोला – मुर्तीजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार- 101 (बाधीत हेक्टर 4 हजार 360)
वाशिम – रिसोड व मालेगाव – 311 (बाधीत हेक्टर 26 हजार 287),
लातूर – लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगा, शि.अनंतपाळ- 308 (बाधीत हेक्टर 16 हजार 361)
उस्मानाबाद – उमरगा व उस्मानाबाद- 122 (बाधीत हेक्टर 30 हजार 112)
हिंगोली – सेनगाव व औढा-39 (बाधीत हेक्टर 1393)
नांदेड – नायगाव, बीलोली, माहूर, किनवट, हदगाव, हि.नगर, धर्माबाद- 327 (बाधीत हेक्टर 29 हजार 535)
यवतमाळ – 10 तालुके- 276 (बाधीत हेक्टर 13 हजार 268)
चंद्रपूर – वरोरा, भद्रावती, राजूरा- 52 (बाधीत हेक्टर 2855)
गोंदीया – देवरी, गोंदीया, सडकअर्जनी, गोरेगाव, तीरोडा, अर्जूनी मोर, आमगाव, सालकेसा-351 (बाधीत हेक्टर 4331)
वर्धा – देवळी, हिंगणघाट, आर्वी, सेलू, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, वर्धा- 306 (बाधीत हेक्टर 5800)
नागपूर – कामठी, सावनेर, काटोला, नरखेड, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरखेड-374 (बाधीत हेक्टर 14559)
भंडारा – मोहाडी तुमसर-32 (बाधीत हेक्टर 1554)
गडचिरोली – कोरची- 7 (21) एकूण 3724 गावातील 2 लाख 90 हजार 395 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजुनही पंचनामे सुरू आहेत. बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे.
COMMENTS