नागपूर – स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने भाजपाचेच नुकसान झाले नाही तर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे विचार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त करत भाऊसाहेबांना आदरांजली वाहिली.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शोकप्रस्तावावर चर्चा झाली त्यावेळी धनंजय मुंडे यांनी भाऊसाहेबांना आदरांजली वाहिली.
भाऊसाहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला आणि जेव्हा शेतकऱ्यांसाठी काही करण्याची संधी मिळाली त्याचवेळी नेमकं ते सोडून गेले. अजातशत्रु व्यक्तीमत्व आज काळाच्या पडदयाआड गेले आहे. भाऊसाहेबांचे नेतृत्व हे खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांचे नेतृत्व होते.
भाजपचे कर्मठ कार्यकर्ते म्हणून त्यांची जास्त ओळख होती. त्यांनी आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेबांनी ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने भाजप पोचवली असेही मुंडे म्हणाले.भाऊसाहेबांनी भाजपसाठी आयुष्य वेचले मात्र सत्ता आल्यानंतर पहिल्यावेळी मंत्रीपद मिळू शकले नाही मात्र त्यांनी कधी नाराजी दाखवली नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षाच्यावतीने भाऊसाहेब फुंडकर यांना आदरांजली वाहिली.
COMMENTS