मुंबई – भगवानगडावरचं महाप्रसादाचं ताट दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे स्वीकारत होते. त्यानंतर पंकजा मुंडेही ते ताट स्वीकारत होत्या. आता त्यांनी तेच ताट नाकारलं आणि ते ताट धनंजय मुंडे यांनी स्वीकारलं. कारण त्यांच्या रक्तातच भगवानबाबांची भक्ती आहे असल्याचं भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी म्हटलं आहे. गेल्या काही वर्षात धनंजय मुंडे यांनी अनेक अपमान पचवले असल्याचंही आहेत. नामदेवशास्त्री यांनी म्हटलं आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार तिघांचेही गुण आहेत. त्याचमुळे त्यांना राजकारणात यश मिळत असल्याचंही नामदेवशास्त्री म्हणाले आहेत.काही दिवसांपूर्वीच नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मंत्री झाल्यावर भगवानगडावर या अशी विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी आता धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
COMMENTS