बीड – भाजपच्या नेत्या आणि पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच वाढला असल्याचं दिसत आहे. पंकजा मुंडे यांनी विनायक मेटे यांना जोरदार धक्का दिला असून शिवसंग्रामचे एकमेव उरलेले नेकनूर, जिल्हा परिषद गटाचे जि.प.सदस्य भारत काळे यांनी आज पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. या अगोदरही शिवसंग्रामच्या तीन जिल्हा परिषद सदस्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला होता.मात्र,आज शेवटचा उरलेल्या एका जिल्हा परिषद सदस्य देखील विनायक मेटेंची साथ सोडत भाजपात दाखल झाल्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विनायक मेटेंना मोठा
धक्का बसला आहे.
दरम्यान महाजनादेश यात्रेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटें यांच्यातील संघर्ष पहायला मिळाला. आमदार विनायक मेटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रथात चढले असता मेटे रथात येताच दोन्ही मुंडे भगिनी रथातून खाली उतरतून निघून गेल्या होत्या. त्यानंतर याचाच वचपा काढायला पंकजा मुंडे यांनी सुरुवात केली असल्याचे दिसत आहे.
शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद नवा नाही. लोकसभा निवडणुकीतही मेटे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. तसेच मेटे यांनी थेट राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवला होता.
त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज मेटे यांना चांगलाच धक्का दिला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS