मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्व मतभेद दूर ठेवून धनंजय मुंडे यांना फोन केला आहे. फोनवरुन त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, असं पंकजा मुंडे धनुभाऊंना फोनवर म्हणाल्या आहेत. त्यामुळे आपले राजकीय मतभेद विसरुन धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी फोन केला आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या चांगली असून मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. धनंजय मुंडे यांना श्वास घेताना थोडा त्रास जाणवत असला, तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच ते 8 – 10 दिवसात कोरोनावर मात करतील, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
यापूर्वी ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे. धनंजय मुंडे हे देखील लवकरच कोरोनाला हरवतील अशी आशा आहे.
COMMENTS