परळी – परळीमधील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या दोघा बहिण-भावाबाबत जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परळी येथे आयोजित ब्राम्हण सभा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात हे दोघं एकित्रत आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान बोलत असताना दोघांनीही एकमेकांचा उल्लेख केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमादरम्यान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर जाऊन धनंजय मुंडे यांची गळाभेट घेतली होती. त्यावेळीही राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढविले गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा हे दोघही एकाच व्यासपीठावर दिसले आहेत. विशेष म्हणजे गेली काही वर्षांपासून या दोघांनीही एकमेकांवर जाहीर टीका करण्याची संधी सोडली नसल्याचं पहावयास मिळालं आहे. अनेकवेळा विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतरही हे सर्व विसरुन ऐन निवडणुकांच्या तोंडावर या दोन्ही भावा-बहिणीची जवळीकता वाढली असल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवीले जात आहेत.
COMMENTS