बीड – पंकजा मुंडेंनी दिला दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा !

बीड – पंकजा मुंडेंनी दिला दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा !

बीड – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे परळी मतदारसंघातील पुस वीस खेडी आणि पट्टीवडगांव नऊ खेडी या गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पुनरुज्जीवन करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. ऐन दुष्काळात दोन्ही योजनांचे पुनरुज्जीवन करून पंकजा मुंडे यांनी दुष्काळात सापडलेल्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पुस २० खेडी आणि पट्टीवडगांव नऊ खेडी या दोन्ही योजना परळी मतदारसंघातील आहेत. थकीत वीज देयक तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे या दोन्ही योजना गेल्या अनेक दिवसांपासून बंद होत्या त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या भागातील ग्रामस्थांनी पंकजा मुंडे यांची भेट घेवून दोन्ही योजना पुर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. योजना पुन्हा सुरू करण्याबाबत पंकजा मुंडे यांनी केलेल्या सूचनेवरून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिका-यांची नागपूर अधिवेशना दरम्यान बैठकही घेतली होती. या बैठकीत पंकजा मुंडे यांनी स्वतः योजनाचा आढावा घेवून त्या तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर आज पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने एक अध्यादेश काढून या दोन्ही योजनांच्या पुनरुज्जीवनास निधीसह मंजूरी दिली.

थकीत वीज बील शासन भरणार

पुस २० खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने ७ कोटी ४४ लाख रुपये तर पट्टीवडगांव नऊ खेडी योजनेसाठी २ कोटी १२ लाख रुपये मंजूर केले आहेत. या रकमेत पुस योजनेचे थकीत असलेले वीज बील २ कोटी ८० लाख रुपये आणि पट्टीवडगांव योजनेचे ४१ लाख ५९ हजार आहे, हे दोन्ही वीजेचे बील शासन भरणार आहे. दरम्यान, या दोन्ही योजना पुर्ववत सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS