पण माझ्यावर ती वेळ आली नाही, कारण समोर चिल्लर होते – पंकजा मुंडे

पण माझ्यावर ती वेळ आली नाही, कारण समोर चिल्लर होते – पंकजा मुंडे

बीड – दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्तानं मुंडे यांना राज्यभरातून आदरांजली वाहिली जात आहे.
परळी येथील गोपीनाथ गडावरही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या 5 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मंत्री रावसाहेब दानवे , महादेव जानकर , हरिभाऊ बागडे ,खा. प्रतापराव पाटील चिखलीकर , खा. सुजय विखे ,खा .हेमंत पाटील ,खा.डॉ.जयसिदेश्वर महाराज , खा. सुधाकर शृंगारे , खा.संजय जाधव ,डॉ.रणजित नाईक निंबाळकर , पालकमंत्री पंकजा मुंडे , खा.प्रीतम मुंडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी स्व मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. आमच्यासाठी हा उध्वस्त झाल्याचा दिवस,या दिवशी आम्ही खूप गमावलं, असं म्हणत पंकजा यांनी स्व मुंडे यांची आठवण जागवली आहे. तसेच पुढच्या वेळी फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमला येतील अशी अशा आणि विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान खुप लोकांनी दुःख यातना दिल्या,पण मी डगमगले नाही,मुंडेंनी मला बळ दिले त्यामुळे मी आज टिकून आहे. या निवडणुकीत मला अनेक लोकांनी शिकवलं,मी लोकांचं ऐकलं पण मनाचं केलं, खेल ताश का हो या जिंदगी का,अपना एक्का तब ही दिखाना जब सामने बादशहा हो पण माझ्यावर ती वेळ आली नाही कारण समोर चिल्लर होते,अस म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

तसेच आम्ही लढणं स्वीकारलं,वंचितांचा विश्वास जिंकण्याचं काम केलं,लोक मुंडे यांना देव मानतात असं सांगितलं. तसेच माझ्या मनात कोनाविषयी पाप नाही,राग नाही,द्वेष नाही,जे जे रस्ता हुकले त्यांच्यासाठी माझी दारं खुली आहेत असं म्हणत दूर गेलेल्यांना परत येण्याचं आवाहनही मुंडे यांनी यावेळी केलं आहे. तसेच जो डर तुम किशतो मे दे रहे हो,वो आलम क्या होगा जब हम ब्याजसमेत वापस करेंगे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

COMMENTS