पंकजा मुंडे यांची तोफ मध्यप्रदेश निवडणूकीत धडाडणार, इंदौरला उद्या तीन सभा !

पंकजा मुंडे यांची तोफ मध्यप्रदेश निवडणूकीत धडाडणार, इंदौरला उद्या तीन सभा !

मुंबई – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्यावर भाजपच्या केंद्रीय समितीने मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली असून उद्या त्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इंदौरला रवाना होणार आहेत. इंदौर क्षेत्रात त्यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत.

मध्यप्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ना. पंकजाताई मुंडे यांना खास या निवडणूकीसाठी पाठवले आहे. आपल्या धडाकेबाज भाषणाच्या शैलीने त्या याठिकाणच्या मतदारांनाही त्या आकर्षित करणार आहेत. उद्या सकाळी मुंबईहून विमानाने त्या इंदौरकडे रवाना होणार आहेत. सकाळी महू येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन त्या सभांकडे रवाना होणार आहेत. सायंकाळी ५ वा. महू विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार उषा ठाकूर यांच्या प्रचारार्थ तर संध्याकाळी ७ वा. इंदौर दोन मतदारसंघाचे उमेदवार रमेश मेंदोल यांच्या प्रचारार्थ रामनगर येथे तर ८ वा. रामबाग व राम दरबार येथे आकाश विजयवर्गीय यांच्यासाठी त्या सभा घेणार आहेत. प्रदेश भाजपच्या वतीने त्यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

COMMENTS