मुंबई – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे या गेली काही दिवसांपासून पक्षापासून दुरावल्या आहेत. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. अशातच आता पंकजा मुंडेंच्या पोस्टर्सवर भाजपचं कमळ गायब झालं असल्याचं दिसत आहे.
उद्या 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी उद्याच्या दिवशी स्वाभिमान दिवस असा नारा देत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. उद्याच्या कार्यक्रमानिमित्त लोकनेत्याला अभिवादन करणारे हजारो बॅनर्स परळी शहरात लावण्यात आले आहेत. मात्र यातील एकाही बॅनरवर भाजपचे चिन्ह नाही. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेही नाहीत. त्यामुळे पंकजांनी खरंच वेगळा मार्ग निवडला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत पंकजा मुंडे यांना पत्रकारांनी पक्षावर नाराज आहात का? असा प्रश्न केला. यावर इतके दिवस थांबला आहात. आणखी एक दिवस थांबा’ असं उत्तर पंकजा यांनी दिलं. तसेच काल एकनाथ खडसे माझ्याकडे आले होते. जेवणाची वेळ होती. आम्ही एकत्र जेवण केलं. ही कौटुंबिक स्वरुपाची भेट होती. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच
जे मुंडे साहेबांच्या गडावर इतके दिवस येत होते, ते सर्व जण येणार आहेत. हा कार्यक्रम वेगळा आहे. त्याला कोणताही राजकीय रंग नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
COMMENTS