…तर धनंजय मुंडेंसाठी मी राजकारणही सोडलं असतं – पंकजा मुंडे

…तर धनंजय मुंडेंसाठी मी राजकारणही सोडलं असतं – पंकजा मुंडे

मुंबई – आमच्या घराण्याची ताकद मोठी होती. बाबा मंत्री होते. मीही लोकांच्या आग्रहाखातर राजकारणात आले. बाबांनी धनंजयलाही आमदार केलं. एवढं सगळं देऊनही तो राष्ट्रवादीत गेला. तो जर भाजपमध्ये असता तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं असं वक्तव्य ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्या ‘न्यूज18 लोकमत’च्या न्यूज रूम चर्चा या कार्यक्रमात बोलत होत्या.

राजकारणात असं एकही घराणं नाही जिथे भांडणं होत नाहीत. सगळ्याच ठिकाणी कुरबुरी सुरू असतात मात्र फक्त मुंडे कुटुंबाचीच चर्चा जास्त होते अशी खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखवली आहे. धनंजय मुंडे यांनी फक्त माझ्याच खात्यावर आरोप केले त्याचं दु:ख असून त्यांच्या कुठल्याही आधार नसलेल्या आरोपांमुळे माझ्यावर भ्रष्टाचाराचे डाग उमटले असल्याची खंतही यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे.

धनगर आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. मात्र तो केंद्राच्या अखत्यारितला विषय आहे. धनगरांचं आरक्षणही कायद्याच्या चौकटीत बसावं यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही त्यासाठी बांधील आहोत. असंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS