शिर्डी – भाजप सरकारविरोधात काँग्रेसनं राज्यभरात जनसंघर्ष यात्रा काढली आहे. काँग्रेसच्या या यात्रेवर भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. संघर्ष हा शब्द सगळ्यांना शोभत नाही, जो खरा संघर्ष करतो त्याला तो शब्द मुकुटासारखा जावून बसतो, गोपीनाथ मुंडे आणि नंतर मी यात्रा काढली होती त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला होता असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान संघर्ष हा शब्द लावल्याने काही होत नसते. हा शब्द लावल्याने तुम्ही संघर्षाशी जोडले जात नाही आणि लोक तुमच्याशी जोडले जात नाहीत. त्यामुळे कोणी कितीही यात्रा काढल्या तरी 2019 ला काहीही फरक पडणार नाही.जे ख-या आरक्षणासाठी लढतायत त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत. प्रकाश ढाकणेंनी वंजारी समाज्याला आरक्षणा बाबत केलेल वक्तव्य मला फारसं माहीत नाही मात्र त्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत या वर मी जास्त बोलणार नसल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS