नागपूर – राज्यस्तरीय पोषण अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोषण अभियान हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान देशातील बालमृत्यू व कुपोषण थांबविण्यासाठी शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच देशाची पिढी सशक्त बनविण्यासाठी यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. सन २०२२ पर्यंत जगात सर्वाधिक तरूणांची संख्या भारतात असणार आहे. त्यामुळे या पिढीला सशक्त बनविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्याकरीता माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी पोषण अभियान राज्यात यशस्वीपणे राबविण्यात यावे. शंभर टक्के हे अभियान राबविणारे महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरावे, अशी अपेक्षाही पंकजा मुंजे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
कुपोषणाचा समूळ नायनाट करण्यासाठी व भावी पिढी सशक्त बनविण्याकरीता राज्यात पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. माता सशक्त असेल तरच सशक्त बालकाचा जन्म होऊ शकतो, यासाठी मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे, या अभियानाच्या माध्यमातून डिजीटल पध्दतीने नोंदवली जाणारी आकडेवारी समोर आल्यानंतर त्या अनुषंगाने उपाययोजना करणे सुलभ होईल, त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी आकडेवारीची नोंद अचूकपणे करावी. जेणेकरुन पोषण अभियानाच्या माध्यमातून माता व बालकाचे पोषण योग्यरित्या होण्याबरोबरच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी या पोषण अभियानाचे उद्दीष्ट्य कुपोषण कमी करणे हे आहे. पल्स पोलिओ मिशन सारखे हे अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. या अभियानाच्या माध्यमातून शुन्य कुपोषण करणे हे उद्दीष्ट्य आहे. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देऊन सर्वांनी समन्वयाने हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी राजेश कुमार, विनीता वेद सिंघल, आसीम गुप्ता यांनीही मार्गदर्शन केले.
COMMENTS