बीड – माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेऊन माझा स्वतःचा जीव जागच्या जागी जाईल’ असं आक्रमक वक्तव्य महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तसेच जयंत पाटील यांच्यावरही त्यांनी सडकडून टीका केली आहे. ‘जयंत पाटलांना हे शोभतं का? 4 वर्षानंतर मुंडे साहेबांच्या मृत्यूमध्ये तुम्हाला राजकारण दिसतं. मुंडे साहेबांची हत्या झाली. खरंतर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
तसेच मुंडे साहेबांना काय झालं हे माहीत असेल तर ज्यांनी केलं त्यांचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमधे आहे. मला कुठल्या तपाशी एजन्सीची गरज नाही. लुच्चा-साल्या लबाड लोकांना मुंडे साहेबांचा मृत्यू एक मोठी संधी वाटते. अरे, मी मुंडे साहेबांची लेक आहे. या जयंत पाटीलाला शोभतं का?’ हे लोक म्हणे, पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा. कारण मुंडे साहेबांची हत्या झाली. हत्या झाली का नाही हा विषय तुमचा नाही. जर तुम्ही छातीठोकपणे राष्ट्रवादीचे नेते आणि जे कुणी बोलतात तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या बीडमध्ये आयोजित मतदार संघातील विकास कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलत होत्या.
COMMENTS