मुंबई – 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद शुजाने केला होता. याबरोबरच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप सय्यद शुजाने केला होता. या प्रकरणाविषयी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे.
या विषयाचं राजकीय भांडवल करणारी मी राजकारणी नाही, मी हॅकर नाही, तपास यंत्रणा नाही, मी एक कन्या आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. अशा गोष्टींमुळे कुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावं लागत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मी स्वतः गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ती चौकशी पूर्ण झाली असून देशातली मोठं मोठी लोकं याची दखल घेतील, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच EVM हॅक होऊ शकत नाहीत हे सिद्ध झालं असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS