माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं तोंडभरून कौतुक !

माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं तोंडभरून कौतुक !

मुंबई – माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मी त्यांना शुभेच्छा देते. उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत असल्याचं मला दिसतंय. टीका करणार नाही. तसं वाटलं तर सूचना करेल. तितका अधिकार मला त्यांच्याविषयी वाटतो. मुख्यमंत्री कुणीही असलं तरी त्याच्यावर आपला अधिकार असतो. त्यामुळे मला वाटतं आतापर्यंत एक चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांविषयी लोकांच्या मनात वेगळं व्यक्तिमत्व असतं. म्हणजे ती व्यक्ती अमूक असावी. त्याने ठराविक कपडे परिधान करावेत. विशिष्ट पद्धतीचं व्यक्तिमत्व असावं. पण, या सगळ्यांपेक्षा ते वेगळे दिसत आहेत.

तसेच त्यांचा पेहराव किंवा सोशल मीडियावर स्वतः अॅक्टिव्ह नाहीत. सीएमओ (मुख्यमंत्री कार्यालय) अॅक्टिव्ह आहेत. हे थोडसं वेगळं दिसतं, कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री स्वतः सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह होते. ते स्वतः ट्विट करायचे. त्यांचा सोशल मीडिया फार स्ट्राँग होता. उद्धव ठाकरे यांचा कल वेगळ्या पद्धतीनं दिसतो आहे. त्यामुळे मला वाटतं ते नवीन असा पायंडा पाडू शकतात. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात करोनावर राज्य सरकार युद्ध पातळी संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या महिनाभरापासून सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही भाजपानं केला आहे. परंतु अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र ठाकरे सरकारचं कौतुक केलं आहे.

COMMENTS