औरंगाबाद – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी मोठी तोडफोड करण्यात आली आहे. औरंगाबादमधील वाळूंज एमआयडीसीतही या आंदोलनादरम्यान तोडफोड झाली. परंतु ही तोडफोड मराठा कार्यकर्त्यांनी केली नसल्याचं मराठा मोर्चानं म्हटलं होतं. त्यानंतर आज महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या एमआयडीसीला भेट दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांची बाजू घेतली असून या आंदोलनादरम्यान उद्योगांच मोठं नुकसान झालं आहे. परंतु असं नुकसान करणं ही मराठा आंदोलकांची भूमिका नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पंकजा मुंडे यांनी या घटनेचा निषेध केला असून या घटनेमागे असलेल्या अपप्रवृत्तीचा शोध घेऊन त्यांना शिक्षा केली जाईल. तसेच सरकार उद्योजकांच्या सोबत आहे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी इथे आले असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS