होय मी बंडखोर प्रवृत्तीची आहे, पंकजा मुंडेची मेळाव्यात मोठी घोषणा !

होय मी बंडखोर प्रवृत्तीची आहे, पंकजा मुंडेची मेळाव्यात मोठी घोषणा !

परळी – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त आज गोपीनाथगडावर खास मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, गिरीश महाजन, विनोद तावडे यांच्यासह नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. होय मी बंडखोर प्रवृत्तीची आहे. आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी बंड केले पाहिजे. तसेच 27 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे. सत्ता असताना बंधनं होती आता मी मुक्त आहे. बेईमानी आमच्या रक्तात नाही. मी पक्ष सोडणार नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर मुंबईत कार्यालय सुरु करणार असून गोपीनाथ मुंडे प्रतीष्ठाणच्या वतीने राज्यभर दौरा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच माझ्यावर पदासाठी दबावाचा आरोप केला जात असेल तर मी आता भाजपच्या कोअर कमिटीची सदस्य नाही, भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून चंद्रकातदादा मी मुक्ती मागत आहे,’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील दुख:ला वाट मोकळी करून दिली.

दरम्यान पक्षाची गरीमा ठेवण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे. आपण पक्ष रिव्हर्स गीअरमध्ये नेऊ नये. पक्ष हा एका व्यक्तीचा नाही. मला कोणत्या पदाची अपेक्षा नाही. मला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून कोणी कारस्थान करत आहे का?, मी पक्ष सोडावं अशी कुणाची अपेक्षा आहे?, मी बंड करणार ही पुडी कुणी सोडली?, माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचं संस्कार  आहेत.माझी अपेक्षा कुणाकडून नाही.  मी शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचा एक एक आमदार निवडून यावा यासाठी प्रयत्न करत होते.
गोपीनाथ मुंडेंनी कधी कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही.

गोपीनाथ मुंडेंचं रक्त अळणी नाही. फाटक्या लोकांनी माझी संघर्षयात्रा काढली. गेल्या काही दिवसात राजकारणाचा जेवढा अनुभव आला तेव्हा कधीच आला नव्हता. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली हे कुणाला कसं कळलं नाही. पराभवासारख्या चिल्लर गोष्टींनी खचणारी मी नाही  असंही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.

COMMENTS