“तसं मी या दिवसाची वाट आजिबात पाहत नाही”, पंकजा मुंडे यांची भावनिक पोस्ट !

“तसं मी या दिवसाची वाट आजिबात पाहत नाही”, पंकजा मुंडे यांची भावनिक पोस्ट !

मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ३ जून रोजी होणाऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाबद्द पंकजा मुंडे यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट

3 जून’ तसं मी या दिवसाची वाट आजिबात पाहत नाही!! अगदी 2 जून 2014 ला जाऊन जग थांबावं असं वाटतं मनात आनंद, उत्साह, समाधान होतं 2 जून ला… बाबा पोटभर रस पोळी खाऊन गेले होते.. शाहू म्हणाला, “आज साहेबांनी खूप आमरस खाल्ला”.. “खाऊ दे रे शाहू” असं त्याला तेच म्हणाले.. तेच अखेरचं जेवण त्यांचं स्वतःच्या घरी.. मग तर पार्थिव देखील घरी आणता आलं नाही.. म्हणून 3 जून उजाडलाच नाही पाहिजे असे वाटते.

गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी संघर्ष दिन म्हणून साजरी केली जाते. त्यासाठी गोपीनाथ गडावर अनेक मुंडे समर्थक जमतात. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यतिथी कार्यक्रम होणार असल्याचं म्हटलं आहे. यावर्षी गोपीनाथ गडावर दर्शनासाठी किंवा मला भेटण्यासाठी गर्दी करु नका, त्याऐवजी घरीच मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा, स्वत:ला जपा, गर्दी करु नका, घरीच राहा, तुमच्या जिवाची काळजी साहेबांच्या एवढीच मला आहे. असही पंकजा मुंडे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

COMMENTS