चंद्रपूर – चिक्की घोटाळ्या प्रकरणी आरोपींच्या पिंज-यात अडकलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे. राज्यातली ग्रामपंचायतीमध्ये वॉटर एटीएम लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ग्रापमंचायती महाऑनलाईनसोबत जोडण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
ही दोन्ही कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणे अपेक्षीत होती. मात्र पंकजा मुंडे यांनी या दोन्ही उपक्रमासाठी चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळालेला पैसा आपल्या खात्याकडे वळवला आहे. आणि नाशिकच्या एका कंपनीला याचे काम दिले आहे. या प्रकरणात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. आता या आरोपावर पंकजा मुंडे काय उत्तर देतात ते पहावं लागणार आहे.
COMMENTS