बीड – पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जोरदार धक्का बसला असून ऐनवेळी रमेश कराड यांनी लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी मागे घेतली आहे. गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं.
दरम्यान रमेश कराड यांनी काही अपरिहार्य कारणांमुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचं कारण विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे. तसेच वेळ निघून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवार राहिला नाही.तसेच रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेल्या सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS