भ्रष्टाचाराच्या आरोपावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया!

भ्रष्टाचाराच्या आरोपावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया!

बीड – राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ‘मी घेतलेला प्रत्येक निर्णय भ्रष्टाचाराने कसा बरबटलेले आहेत. हे गेले चार वर्ष एकाच माणसाकडून सांगण्याचा प्रयत्न होतोय. पण अशा गलथान आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. या आरोपाबाबत माझ्या विभागाने खुलासा पाठवला आहे. त्यामुळे मी अशा आरोपांना महत्व देत नाही,’ असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यातील ८५ हजार अंगणवाडी केंद्रावर सेविकांना देण्यात येणा-या स्मार्टफोन मोबाईल खरेदीत महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुमारे १०६ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून मी घेतलेला प्रत्येक निर्णय भ्रष्टाचाराने कसा बरबटलेले आहेत. हे गेले चार वर्ष एकाच माणसाकडून सांगण्याचा प्रयत्न होत अल्याची टीका त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.

COMMENTS