कुणाचं घर फोडून राजकारण करू नये – पंकजा मुंडे

कुणाचं घर फोडून राजकारण करू नये – पंकजा मुंडे

बीड – राजकारणातही काही गोष्टी पाळल्याच पाहिजेत. रक्ताची नाती जेव्हा तुटतात तेव्हा त्याची वेदना काय असते ते मी भोगलं आहे. त्यामुळे असाच प्रसंग जेव्हा जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात आला तेव्हा मी त्यांच्या पाठिशी राहिले. कुणाचं घर फोडून राजकारण करू नये असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना लगावला आहे. बीड नगरपरिषदेच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हा टोला लगावला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

दरम्यान बीड नगरपालिकेला दिलेलं आश्वासन पूर्ण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ही पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असली तर विकासाच्या कामात आम्ही राजकारण केलं नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. बीड नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

COMMENTS