पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिदेंना जीवे मारण्याची धमकी

पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिदेंना जीवे मारण्याची धमकी

नवी मुंबई – पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी निनावी पत्राव्दारे देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची तक्रार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे करण्यात आली आहे.
महापालिकेच्या टपालात 21 नोव्हेंबरला एक पत्र आले होते. त्या पत्रात आयुक्त शिंदे यांना शिस्तीत रहा, जास्त हुशारी करू नको अशा भाषेत अर्वाच्च शिविगाळ करण्यात आली आहे. पत्र महापालिकेत पोहोचले तेव्हा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे चीनच्या दौर्‍यावर होते. दौऱ्यावरुन परतल्यानंतर त्यांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या उपायुक्त संध्या बावनकुळे आणि जमीर लेंगरेकर यांनाही धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या धमक्यांना आपण घाबरत नसून महानगरपालिकेचे कामकाज पारदर्शकतेनेच सुरू ठेवणार असल्याचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

 

COMMENTS