परळी वैजनाथ – एका वैयक्तिक वादामुळे काही जण येथील सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सातत्याने परळीच्या उन्नतीसाठी तसेच सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी मराठा व वंजारी हे दोन्ही समाज प्रयत्नशील आहेत व राहतील अशी ग्वाही दोन्ही समाजातील जेष्ठ मंडळींनी बैठकीत दिली.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात दोन्ही समाजातील जेष्ठ मंडळी आज एकत्र आली होती. वैयक्तीक भांडणात काही जण विनाकारण धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत याचा उपस्थितांनी निषेध व्यक्त केला. यात उल्लेखनीय बाब म्हणजे गणेश दिलीप कराड व अमर वसंतराव देशमुख या दोघांच्या कुटुंबियांचे गेल्या पंचवीस वर्षांपासून घरगुती संबंध आहेत. काही वैयक्तीक व्यवहारांमुळे जे भांडण झाले त्याला काही समाज कंटक जातीय रंग देऊन आपली पोळी भाजण्याचा दुर्दैवी प्रयत्न करत आहेत. तसेच विरोधी पक्ष याला राजकीय वळण देण्याचा डाव आखत आहे तरी कुठल्याही अफवांना बळी न पडता शहरातील सामाजिक आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असे आवाहन या बैठकीत उपस्थितांनी केले आहे.
सोशल मीडियावर किंवा इतरत्र जे कोणी दोन समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्या संबंधितांवर दोन्ही समाज एकत्रितपणे कायदेशीर कारवाई करतील असा निर्धार यावेळी केला गेला.
बाळासाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, कृ.उ.बा.समिती सभापती अॅड.गोविंदराव फड, वैजनाथ सोळंके, शंकर कापसे, दिनेश गजमल, तुळशीराम पवार, पं.स.उपसभापती बालाजी उर्फ पिंटु मुंडे, शरद विठ्ठलराव मुंडे, राजाभाऊ पौळ, रमेश भोयटे, विजय भोयटे, बाळासाहेब सोनवणे, केशव साबळे, नितीन निर्मळ, दत्ताराव गव्हाणे, दत्तात्रय गुट्टे, विष्णुपंत देशमुख, नितीन कुलकर्णी, अनंत इंगळे, अमर गित्ते, सुरेश गित्ते, संग्राम गित्ते, अनंत केंद्रे, जगमित्र पौळ, शरदराव राडकर, रघुनाथ फड, प्रशांत कोपरे, अमरनाथ गित्ते, इंद्रजित होळंबे, राजेभाऊ गिराम, शरद राडकर, भाऊसाहेब राडकर, प्रभाकर पौळ, सुर्यभान मुंडे, गिरीष भोसले, सचिन मराठे, अॅड.प्रकाश मुंडे, तात्याराव घोडके यांसह मोठ्या संख्येने दोन्ही समाजातील जेष्ठ मंडळी उपस्थित होते.
COMMENTS