परळी वैजनाथ – परळीतील बँका,शासकीय कार्यालये याठिकाणी मोठ्याप्रमाणावर येणारे नागरीक, अभ्यागत यांच्या सुरक्षिततेसाठी व निर्जंतुकीकरणासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेले पॅडल हॅण्डफ्री डिस्पेन्सर उपयुक्त ठरणार असल्याच्या भावना अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी व्यक्त केल्या. परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिना निमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वोपयोगी उपक्रम राबवण्यात आला.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आज दि.१० जुन रोजी परळी शहरातील गर्दीच्या ठिकाणी पॅडल हॅण्डफ्री डिस्पेन्सर चे वाटप करण्यात आले.जग सध्या कोरोना महामारीच्या महाभयंकर संकटाशी सामना करत आहे.या पार्श्वभूमीवर अगदी सुरुवाती पासून कोरोना प्रतिबंधक मोहीमेत अग्रेसर राहिलेल्या परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा व कोरोना प्रतिबंधक मोहीमेत योगदान देणारा उपक्रम राबवण्यात आला. परळी शहरातील न्यायालय, तहसील, पोलीस स्टेशन, नगर पालिका,कृषी कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडिया,महाराष्ट्र बँक, पंचायत समिती,यासह अन्य गर्दीच्या ठिकाणी पॅडल हँडफ्रि डिस्पेन्सर वाटप करण्यात आले.
विविध ठिकाणी त्या त्या कार्यालयांच्या प्रमुखांकडे हे डिस्पेन्सर सुपूर्द करण्यात आले. यामध्ये तहसीलदार विपीन पाटील साहेब,मुख्याधिकारी अरविंद मुंडे,पोलीस निरीक्षक हेमंत कदम,संभाजी नगर ठाणे पवार साहेब,डेपो मॅनेजर राजपुत,स्टेशन मास्तर श्रीनिवासन,वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे,कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रोखपाल गोविंद मुंडे, इंडिया बँकेत व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव, मंगेश कुंभार, वकील संघाचे अध्यक्ष पी.एम.सातभाई,यांनी डिस्पेन्सर स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,सुरेशअण्णा टाक,अय्युब भाई पठाण, स्वच्छता सभापती किशोर पारधे,गोपाळ आंधळे, अनिल आष्टेकर,महादेव रोडे,अनंत इंगळे,सय्यद सिराज, शंकर कापसे,शेख शम्मो,दिनेश गजमल,रवी मूळे,संजय देवकर, शाम सुंदर दासूद,जमील अध्यक्ष के.डी.उपाडे, लाला खान पठाण, अमित दुप्ते,जयदत्त नरवटे,रामदास कराड, योगेश नानावटे,मोहन साखरे,अनंत ढोपरे,राम ढेंगळे,पवन फुटके, शेख खमरुद्दीन आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS