“ताईसाहेब ‘त्या’ कायद्याचे नको आता वायद्याचे बोला!”

“ताईसाहेब ‘त्या’ कायद्याचे नको आता वायद्याचे बोला!”

परळी वै. – परळीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यामुळे १७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी 370 च्या कायद्यावरून मतं मागण्याऐवजी परळीतल्या ज्वलंत समस्यांवर बोलावे अशी मागणी केली जात आहे. मागील निवडणुकीतील जाहीरनाम्यात ताईंनी दिलेल्या अश्वासनातील कोणकोणते वायदे पूर्ण केले त्यावर बोलावे असा सूर परळीतील नागरिकांनी आळवला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जिल्ह्यात येऊन गेले होते. सावरगाव येथील दसरा मेळाव्यात काश्मीर मधील 370चा सूर शहांनी आळवल्यानंतर राज्यभरातून त्यावर टिकेची झोड उडाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता कायद्याचे नको वायद्याचे बोला असे परळीतील नागरिक म्हणत आहेत.

विधानसभेची निवडणुक काश्मीरच्या मुद्द्यावर नव्हे तर स्थानिक मुद्यांवर असावी याबाबत देशभरात मोदी गो बॅक हा ट्रेंड सोशल मीडियावर लोकप्रिय होत असून परळीतही अशीच परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. तीन वर्षांपासून अपूर्ण असलेला अंबाजोगाई रस्ता तर आता थट्टेचा विषय बनला आहे.

तर नागरिकांनी ताईंना त्यांच्याच मागील निवडणुकीतील घोषणपत्राची आठवण करून दिल्याचेही समजते! ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मागील त्या घोषणपत्रातील एकही घोषणा पूर्णपणे पूर्ण करू शकल्या नसल्याचा आरोपही नेटकरी व विरोधी उमेदवारांकडून केला जात आहे; त्यामुळे आता मोदींना केलेलं 370च्या कायद्यावर नको तर तुम्ही दिलेल्या वायद्यांवर बोला हे आवाहन समर्पक करत असल्याचे दिसत आहे.

COMMENTS