पंतप्रधान मोदींच्या सभेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची व्हॅनला अपघात, धनंजय मुंडेंनी केली मदत!

पंतप्रधान मोदींच्या सभेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची व्हॅनला अपघात, धनंजय मुंडेंनी केली मदत!

बीड, परळी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परळीतील सभेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची व्हॅनला अपघात झाला आहे. परळी बीड रस्त्यावर सिरसाळा नजीक व्हॅन पलटून हा अपघात झाला असून यामध्ये चालकासह 10 ते 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

यावेळी या ठिकाणाहून जाणाऱ्या धनंजय मुंडे यांनी तातडीने उतरून मदत कार्यात सहभाग घेतला. सर्व कर्मचाय्रांची चौकशी करुन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

दरम्यान यापूर्वीही धनंजय मुंडे यांनी उस्मानाबादमध्ये 16 जानेवारी 2018 मध्ये झालेल्या एका अपघातग्रस्ताला मदत केली होती. धनंजय मुंडे यांनी रस्त्यात अपघात झालेल्या एका मोटार सायकलस्वारास वेळीच मदत करून त्याचे प्राण वाचवले होते.कळंब -ढोकी रस्त्यावर पिंपळगाव पाटीजवळ उस्मान शेख निपाणी ( वय ४५) याची मोटारसायकलवरून जात असताना रस्त्यात आडव्या आलेल्या म्हशीला मोटार सायकलला जोराची धडक बसली होती.

यात शेख हे जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. त्याच्या डोळ्यातून मोठा रक्तस्त्राव होऊ लागला होता. त्याचवेळी कळंबहून उस्मानाबादकडे जात असलेल्या धनंजय मुंडे यांनी रस्त्यावरील जखमी व्यक्तीस पाहून गाडी थांबवली. स्वतः खाली उतरुन त्या जखमी व्यक्तीची पाहणी केली. सोबतच्या पोलिस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस गाडीमधून तातडीने जखमीस उस्मानाबादच्या रुग्णालयात रवाना केले. रुग्णालयातील डॉक्टरांनाही रुग्णाची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

आजही त्यांच्या मा‌ुसकीचे दर्शन घडले असून त्यांनी स्वच: रस्त्यावर उतरुन पोलिसांना मदत केली.

COMMENTS