इंदापूर – छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नुतन अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांचा मृत्यू !

इंदापूर – छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नुतन अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांचा मृत्यू !

पुणे, इंदापूर – छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नुतन अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांचा मृत्यू झाला आहे. बंदूक साफ करत असताना चुकून गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला असल्याचं बोललं जात आहे. आज सकाळी ही घटना घडली असून दुपारी तीनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वीच प्रदीप निंबाळकर यांनी छत्रपती कारखाना चेअरमन पदाचा कार्यभार स्वीकारला होता. परंतु अशातच ही घटना घडली असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती . प्रदीप निंबाळकर हे आज दुपारी सणसर (ता. इंदापूर) येथील राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर होते. तेथे ते रिव्हॉल्वर साफ करत होते. त्यावेळी चुकून गोळी उडाल्याने ते जखमी झाले. गोळीच्या आवाजाने घरातील सदस्यांनी जाऊन पाहिले असता, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर तातडीने त्यांना बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले.

.

COMMENTS