अकोला आणि सोलापुरातून प्रकाश आंबेडकर जिंकणार का ?, एक्झिट पोल !

अकोला आणि सोलापुरातून प्रकाश आंबेडकर जिंकणार का ?, एक्झिट पोल !

मुंबई – देशातील सर्व टप्प्याचं मतदान आज संपलं. आता सर्वांचे डोळे लागले आहेत. ते 23 मेच्या निकालाकडे. अनेक वाहिन्यांनी आणि संस्थांनी आता एक्झीट पोल जारी केले आहेत. महाराष्ट्रातील सर्व 48 जागांचा अंदाज आम्ही वर्तविला आहे. स्थानिक पत्रकार, स्थानिक राजकीय अभ्यासक, पडद्यामागच्या घडामोडी, मतदानाच्या टक्केवारीचे विश्लेषण यावरुन आम्ही निकालाचे अंदाज बांधले आहेत.

एक्झिट पोल

एकूण जागा – 48

भाजप    शिवसेना   काँग्रेस   राष्ट्रवादी     इतर

विदर्भ                      3            2             3              2         0

मराठवाडा              3           1               2               2          0

प.महाराष्ट्र               1           2               1              4           2

उ. महाराष्ट्र             3           2               1              2           0

मुंबई-कोकण          3           5              2              1           1

एकूण                     13          12            9             11          3

 

दरम्यान महाराष्ट्रात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीमुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. पण विविध माध्यमांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात एकही जागा जिंकता येणार नाही. तसेच प्रकाश आंबेडकर हे स्वत: सोलापूर आणि अकोला मतदारसंघात लढत आहेत. मात्र तिथंही त्यांना अपयश येईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. अकोल्यात भाजपा तर सोलापूरमध्ये काँग्रेसचा विजय होईल असा अंदाज आहे. त्यामुळे या एक्झिट पोलनुसार प्रकाश आंबेडकर यांना राज्यात मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS