सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे एक महिन्यापूर्वी निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंचिव पार्थ पवार लढणार असल्याची चर्चा रंगत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन तीन वर्षांपासून पवार कुटुंबातील दोन नातू कशाच्या कारणाने चर्चा होत असते. या दोन नातूची राजेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित पवार आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यात तुलना केली जाते. रोहित पवार यांनी राजकारणात प्रवेश करताना साखर कारखाना, जिल्हा परिषद आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवली. ते प्रत्येक निवडणूकीत विजयी झाले. परंतु पार्थ पवार यांनी थेट मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण ते पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरले. तसेच त्यांनी मागील काही महिन्यात पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कानपिचक्या दिला. तेव्हापासून त्यांनी नरमाईची भूमिका घेतली.
मंगळवेडा या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. याच जागेवर पार्थ पवार यांना तिकीट देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी ही मागणी केली आहे. अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तसं पत्र लिहिलं आहे. पंढरपूर मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केली. तसेच भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात यावी, असे एका गटाला वाटत आहे
यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूरात यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. याबाबत पक्षाच्या बैठकीत जो निर्णय होईल, त्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.
COMMENTS