अखेर पाशा पटेल यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला !

अखेर पाशा पटेल यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला !

मुंबई – राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. सरकारतर्फे काल ही घोषणा करण्यात आली आहे. 1 जुलै 2017 रोजी पाशा पटेल यांची राज्य कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. खरंतर कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो. मात्र त्याबाबतचा जीआर सरकारने काल (16 नोव्हेंबर 2017 रोजी) काढला.

दि.१ जुलै २०१७ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावेत व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा या दुहेरी उद्देशाने गठित करण्यात आलेल्या राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल यांची  ‍नियुक्ती करण्यात आली. मात्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात आलेली जबाबदारी आणि कामकाजाचे स्वरूप तसेच अध्यक्षांना केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगामध्ये करावे लागणारे राज्याचे प्रतिनिधीत्व या सर्व बाबींचा विचार करून शासनाने राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदास समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

COMMENTS