प्रफुल्ल पटेल – नाना पटोले एका स्टेजवर, पुढील राजकीय समिकरणांची चर्चा…

प्रफुल्ल पटेल – नाना पटोले एका स्टेजवर, पुढील राजकीय समिकरणांची चर्चा…

भंडारा – राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शस्त्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो हे आपल्याला नेहमी पहायला मिळतं. भंडारा गोंदियामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री फ्रफुल्ल पटेल आणि नुकतेच काँग्रेसवासी झालेले नाना पटोले हे एकमेकांचे कट्टर शस्त्रू. यापूर्वी नाना पटोले हे भाजपमध्ये असल्यामुळे ते उघडपणे एकमेकांच्या विरोधात लढत होते. मात्र काही दिवसांपूर्वी नाना पटोले हे काँग्रेसमध्ये आले. त्यानंतरही या दोन  नेत्यांमध्ये फारसं सख्य नव्हतं. त्यामुळे आता भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त भंडारामध्ये एका सामाजिक संस्थेने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. एरव्ही एखाद्या कार्यक्रमाला पटेल येणार असतील तर पटोले तो कार्यक्रम टाळत असत किंवा पटोले येत असतील तर पटेल त्या का कार्यक्रमाला जायचे टाळत असत. पण काल राजकारणातले हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आणि एकममेकांच्या शेजारी बसले होते. एवढच नाही. तर दोन्ही नेत्यांमध्ये बरचं गुप्तगु सुरु होतं. दोन नेत्यांना एकत्र पाहून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती. पटोले हे आता लोकसभेऐवजी विधानसभा लढवण्यास उत्सुक आहेत. त्यामुळेच आता प्रफुल्ल पटेल यांचा लोकसभेचा मार्ग मोकळा झाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

COMMENTS