नागपूर – युतीच्या जागावाटपाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये जागा वाटपात एकमेकांच्या सीटिंग जागांना हात लावायचा नाही, ही भाजप आणि शिवसेना दोघांचीही मानसिकता असल्याचं विधान पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना – भाजप फिफ्टी-फिफ्टी जागांचं गणित कसं साधणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान आमचे 122 आमदार आणि आमच्यासोबत असलेले अपक्ष सहा आणि नव्याने आलेले चार असे 132 आमदार सीटिंग आहेत. मग आम्हाला 50 टक्के म्हणजे 135 जागा द्यायच्या म्हटल्यावर आणखी तीनच जागांवरच चर्चा होईल. याची जाणीव आम्हाला आहे तशीच शिवसेनेला देखील आहे. जागावाटप करताना राज्यभरातील जागांचा एकूण विचार केला जाणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS