बंगळुरु – केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर आता जोरदार टीका केली जात आहे. धर्मनिरपेक्षता घटनेतून काढून टाकू त्यासाठी सत्तेवर आलो असल्याचं वादग्रस्त वक्तव्य हेगडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून जोरदार टीका केली जात असून अनंतकुनार हेगडे यांची जीभ कापा आणि 1 कोटींचं बक्षिस घ्या असं वक्तव्य कर्नाटकमधील माजी जिल्हा पंचायत सदस्य गुरुशांत पट्टेदार यांनी केलं आहे.
अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दलित, मुस्लिम, मागासलेल्या आणि धर्मनिरपेक्ष लोकांची मनं दुखावली असल्याचा आरोप गुरुशांत पट्टेदार यांनी केला आहे. ‘अनंत कुमार हेगडे यांच्या वक्तव्याचा मी निषेध करत असून त्यांची जीभ कापणा-याला 1 कोटींच रोख बक्षीस दिलं जाईल’, असं गुरुशांत पट्टेदार म्हणाले आहेत. एमआयमसोबत हातमिळवणी केलेल्या गुरुशांत पट्टेदार यांनी आपण आपल्या इच्छेने ही घोषणा करत असल्याचं सांगितलं आहे.
त्यावेळी बोलत असताना पट्टेदार यांनी ‘एका महिन्याच्या आत म्हणजेच 26 जानेवारीपर्यंत जो कोणी हेगडेंची जीभ छाटून आणेल त्याला 1 कोटींचं बक्षीस देण्यास मी तयार आहे’, असं ते म्हणाले आहेत. अनंत कुमार हेगडे यांनी राज्यघटनेचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
COMMENTS