नेतृत्व करण्यासाठी अजित पवार आहेत मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार यांचे मोठे विधान

नेतृत्व करण्यासाठी अजित पवार आहेत मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार यांचे मोठे विधान

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा संच मोठा आहे. या सर्वांतून मान्य असतील असे अनेक लोकांची नावं घेता येतील. अजित पवार आहेत, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशी अनेक नावं देता येतील जी नेतृत्व करण्यास सक्षम आहेत.  सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणास रस नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट करीत सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत मोठं विधान केलं आहे.

सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झालं आहेत. त्यांना देशपातळीवरच काम करण्याची आवड आहे. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवरील राजकारण आणि कामात आहे,” असे शरद पवार म्हणाले. त्यांनी दैनिक लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमत्रीपदाबाबतची चर्चा फेटाळून लावली.

शरद पवार म्हणाले, भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. परंतु त्यानंतर शेलार यांनी ते वक्तव्य राजकीय नसून पुस्तकातील संदर्भाशी निगडीत असल्याचं म्हटलं होतं.

 

COMMENTS