अन्नदात्याचा अंत पाहू नका –  शरद पवार

अन्नदात्याचा अंत पाहू नका – शरद पवार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कृषी कायद्यांबाबत पुनर्विचार केला पाहिजे. हे कायदे चर्चा न करता मंजूर करण्यात आले होते. या कायद्यांवर चर्चा करा असे सर्वांनी म्हटले होते. मात्र विरोध पक्षांचे म्हणणे बाजूला सारत केंद्र सरकारने घाईघाईत हे कायदे पारीत केले. केंद्र सरकारने अन्नदात्याचा अंत पाहू नये, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

पवार म्हणाले, केंद्र सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्याच्या मनस्थितीत नाही असा विचार करणे गैर आहे. याच कारणामुळे हे आंदोलन असेत पुढे सुरू राहील, सध्या हे आंदोलन दिल्लीच्या सीमेपर्यंत मर्यादित आहे. जर योग्य वेळी निर्णय घेतला गेला नाही, तर हे आंदोलन इतर ठिकाणीही पसरेल. यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये, अशी विनंती आपण केंद्र सरकारला करत असल्याचे पवार म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा सोळावा दिवस आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत. सरकारचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे सरकारने सध्या कृषी कायदे मागे द्यावेत, अशी मागणी पवार यांनी केली.

https://business.facebook.com/MahapoliticsMarathi/videos/710702436535517/

 

COMMENTS